ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये
खरा भारत खेड्यात राहतो अस महात्मा गांधी यांनी म्हटले होते , ते आजही योग्य आहे कारण भारताची मोठी लोकसंख्या आजही खेड्यातच राहते. खेडे किंवा ग्रामीण भाग किंवा गाव म्हणजे 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली लोक वस्ती जिचा मुख्य आर्थिक स्त्रोत शेती आहे.
ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
१. कमी लोकसंख्या :
ग्रामीण भाग हा शहरापासून दूर असतो आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या कमी असते ,वर नमूद केल्या प्रमाणे 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असते अशी वस्ती म्हणजे ग्रामीण भाग ,परंतु सध्याच्या काळात ग्रामीण भागाची लोकसंख्या वाढत आहे अनेक गाव 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले आहेत .महाराष्ट्रात अनेक गावांचे दोन भाग झालेले दिसतात ,पहिला भाग 'जुने गाव ' हे गाव मूळ गाव असते सर्वप्रथम तेथेच वस्ती झालेला असते जुने गावात जुने वाडे ,मोठी घरे , कोठारे दिसुन येतात अशी बहुतांश गावे पाण्याच्या स्त्रोताजवळ वसलेली आठ्ळतात नदी, तलाव ,जुनी वहीर जी पूर्ण गावाला पाणी पुरवायची ,या विरुद्ध नवे गाव हे गाव म्हणजे जुन्या गावाचे विस्तारित आणि आधुनिक रूप असते. नव्याने विकसित झालेले हे गाव जुन्या गावाच्या परिघावरच असते अशी वस्ती मुख्य गावापासून जाणाऱ्या महामार्ग ,बस स्थानक किंवा इतर महत्वाच्या ठिकाणाजवळ वाढते .
या वस्तीत संयुक्त कुटुंबातून विभक्त झालेला ,गावात नोकरी निम्मित स्थायिक झालेले ,व्यापार करण्याच्या दृष्टीने आलेले लोक स्थायिक होतात .
२. शेती प्रधान :
ग्रामीण भागाची ओळखच शेती आहे,कारण लोकसंख्या कमी असो किंवा जास्त जी वस्ती शेती वर अवलंबुन असते तिलाच ग्रामीण भाग असे संबोधतात, कारण ग्रामीण भागाची अनेक वैशिष्ट्ये हि शेती प्रधान समुदायातच आठळतात ,लोकसंख्या कमी असेल मात्र लोकवस्तीतील बहुतांश लोक कारखान्यात काम करत असतील तर त्य समुदायास ग्रामीण समुदाय संबोधले जात नाही . उदा . एखाद्या कारखान्यात काम करणारे कामगार कारखान्याभोवती वस्ती निर्माण करतात ,या कारखान्यात काम करणारे लोकं ग्रामीण भागातले असले तरी या वस्तीला ग्रामीण समुदाय संबोधले जात नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या शेती करणारी असते किंवा शेतीवर अवलंबून असते
३.संयुक्त कुटुंब :
संयुक्त कुटुंब पद्धती हे ग्रामीण भागाचे वैशिष्ट्ये आहे,ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंब पद्धती या साठी पुरक होती कारण पूर्वी शेतीचे क्षेत्र मोठे असायचे त्यमुळे एकत्रित कुटुंबामुळे आवश्यक तेवढे मनुष्यबळ शेतीच्या कामासाठी उपलब्ध असायचे कारण आज पासून चार-पाच दशक पूर्वी शेतीचा आकार मोठा होता आणि आधुनिक यंत्र सुद्धा नव्हते .त्यामुळे शेतीची कामे वेळखाऊ असायची या साठी एकत्र कुटुंब पद्धती उपयुक्त ठरायची मात्र सध्या शेतीचे दरडोई क्षेत्र कमी होत आहे व यांत्रिकीकरण वाढले आहे तसेच आर्थिक उत्पन्नाचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने संयुक्त कुटुंबांचे प्रमाण कमी होताना दिसते .
४.निसर्ग सानिध्य :
ग्रामीण भागाचे आपल्या डोळ्यासमोर येणारे चित्र म्हणजे नदी किनारी वसलेले गाव, छोट्या डोंगररांगा ,पशु पक्षी असे असते.ग्रामीण भाग हा निसर्ग सानिध्यात असतो, शेती प्रधान जीवन शैली मुळे निसर्गावर अवलंबुन असणारा हा लोकसमूह आहे, निसर्गाच्या कृपा आणि अवकृपा या दोन्ही चा ग्रामीण भागावर परिणाम होतो उदा. एखाद्या गावात महापुर आल्यास शेतीचे नुकसान तर होतेच मात्र शेतीची सुपीक मृदा वाहून जाते याचा परिणाम पुढील अनेक वर्ष शेतकऱ्यांना भोगावा लागतो मात्र शहरात महापुर आला किंवा अतिवृष्टी झाली तर १-2 दिवसात जनजीवन विस्कळीत होते नंतर मात्र सुरळीत होते. ग्रामीण जीवनात आता बदल होत आहेत पूर्वी फक्त शेतीच नवे तर अनेक गरजेच्या वस्तु साठी निसर्गावरच अवलंबुन असत आता मात्र आधुनिकीकरण ग्रामीण भागात पोहचले आहे, त्याचा परिणाम ग्रामीण जीवन शैली वर होत आहे.
५. एकजिनसीपणा :
एकजिनसीपणा म्हजे ग्रामीण भागाची जीवनशैली हि एकाच प्रकरची आहेत ,यात विविधता नसते . शेतमजुर असो किंवा मोठा शेतकरी त्यांचा दिनक्रम सारखाच असतो, शहरांमध्ये दिसुन येणारी बहुविध जीवन शैली इथे नसते, कुटुंब,शेती आणि गाव या .त्रिकोनातच त्यांचे जीवन असते.
६. सामाजिक स्तरीकरण :
ग्रामीण समाज जीवनात सामाजिक स्तरीकरण मोठ्या प्रमाणात आठळते, भारतात हे स्तरीकरण प्रामुख्याने जाती व्यवस्थेच्या स्वरूपात आठळते, ग्रामीण भागात आजही जाती निहाय वस्ती दिसते ,सामाजिक मागासवर्गीय लोकांना आजही योग्य तो सन्मान मिळत नाही, मात्र शिक्षण आणि आधुनिकीकरन या मुळेहळू हळू सामाजिक स्तरीकरण आता लवचिक होत आहे, पूर्वी सारखी कर्मठता राहिली नाही, मात्र ती पूर्ण पणे नष्ट झाली आहे असेही नाही.
७.पायाभुत सुविधांचा अभाव :
ग्रामीण भागात मुलभूत पायाभुत सुविधांचा अभाव आढळून येतो, रस्ते,पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा ,शाळा इत्यादी सुविधा नसतात, ग्रामीण भागात कच्चे रस्ते असतात,काही गावात जाण्यासाठी नदीवर पूल असणे आवश्यक आहे मात्र असे पूल नसतात .त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क तुटतो,२०१९ च्या आकडेवारी नुसार भारतातील ग्रामीण भागत आजही ८० टक्के लोकांना पण्याचे पाणी नळाव्दारे मिळत नाही तर त्यांना ते पाणी हातपंप,विहीर नदी किंवा सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतावरून आणावे लागते या सारखे अनेक प्रश्न आहेत,पायाभूत सुविधा ह्या ग्रामेण विकासासाठी आवश्यक आहेत