10,000 तास यशप्राप्तीचे .......
Gladwell's च्या Outliers: The Story of Success, या पुस्तकात 10,000 तास यशासाठी हि संकल्पना मांडली आहे , या संकल्पनेवर बरीच चर्चा झाली आहे काहीना हि संकल्पना उथळ व निरर्थक वाटते तर काहीना हि संकल्पना प्रभावी व जीवन बदलण्यास सक्षम आहे असे वाटते .
5.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे, तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर तुम्हाला खूप मेहनत घेणे आवश्यक आहे , अनेक खेळाडू हे प्रतिभाशाली असतात त्यांच्यात गुणवत्ता असते असे खेळाडू सहज नाव कमावतात मात्र काही खेळाडू असेही आहेत जे कठीण परिश्रम करतात आणि जग विख्यात होतात,प्रतीभ्शाली खेळाडूंना सुद्धा सर्वाची गरज असते.
MPSC,UPSC आणि इतर सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते ,पोलीस भरतीचेच उदाहरण घ्या, १ जागेसाठी 4 हजार ते ५ हजार उमेदवार असतात. तुम्ही 12 वी उत्तीर्ण झाल्यावर ध्येय निश्चित केले आणि 10 हजार तास हि पद्धत वापरली तरी तुम्ही निश्चितच यश मिळवू शकतात वर्ग १ च्या पदासाठी निवड होऊ शकते जर ध्येय निश्चित करण्यात उशीर झाला तर हा कालावधी अजून वाढू शकतो . 10 हजार तास अभ्यास तो हि एकाग्रतेने केल्यास यश निश्चित आहे, आणि यश 10 हजार तास पूर्ण होण्यापुर्वीसुद्धा मिळु शकते ,विशेषत स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 हजार तास हि पद्धत उपयुक्त ठरू शकते कारण या व्दारे अतिशय कठीण मानल्या जाणार्या या परीक्षांमध्ये यश प्राप्ती निच्छितच होऊ शकते, काही विद्यार्थी जे अतिशय प्रगल्भ आणि अभ्यासू आहेत यांना या पद्धतीमुळे दैदिप्यमान यश मिळू शकते .
फक्त नोकरीच नाही तर जीवनातील सर्वच महत्वाच्या घटकांसाठी हि पद्धत उपयुक्त आहे,व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी , शरीर सौष्ठव (body building), वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठी नियोजन करून अभ्यास पूर्ण मार्ग निवडून निश्चित ध्येय प्राप्त करता येऊ शकते.
10 हजार तास चा मंत्र डोळ्यासमोर ठेवुन तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय कसे प्राप्त करायचे याचे नियोजन करा ,स्व:ताची क्षमता ओळख आणि असलेली क्षमता वाढवण्याच्या पर्यंत करा , यश तुमचेच आहे . सर्व धडपडणाऱ्या तरुणांना शुभेच्छा ,
लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा, comment करा ,लेख आवडला तर तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना पाठवा , तुम्हाला हव्या असलेल्या विषयाचे नाव टाका त्या विषयवार लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन
महत्त्वपूर्ण माहिती👍
उत्तर द्याहटवा