भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. भारतातील बेरोजगारीचे अनेक कारणे आहेत,त्यातील प्रमुख कारण म्हणजे कौशल्याचा अभाव. भारतातच नव्हे तर जगभरात कौशल्य असणाऱ्या कामगारांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे .भारतात असलेली तरुण लोकसंख्या हि मागणी पूर्ण करू शकते .
भारत सरकारच्या Ministry of Rural Development ( ग्रामीण विकास मंत्रालयाने ) २०१४ मध्ये या योजनेची घोषणा केली. हि योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती योजना चा भाग आहे .ग्रामीण भागातील लोकांचे जीवन समृद्ध करण्या बरोबरच युवकाना कौशल्य देता यावे यासाठी दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना चा अंतर्भाव राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती योजना मध्ये करण्यात आला आहे .
दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील १५ ते ३५ वयोगटातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देते . या योजनेमुळे Make in India, Stand Up India, Smart City या सारख्या प्रकल्पांना लागणारे मनुष्यबळ मिळणार आहे . भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 69 % लोकसंख्या हि 18-35 या वयोगटातील म्हणजेच तरुण आहे त्यामुळे या योजनेची गरज अधोरेखित होते.
National Policy for skill development and Entrepreneurship 2015 अंतर्गत एकूण 24 कौशल्यांची गरज नोंदविली आहे .दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 28 राज्यातील 689 जिल्ह्यातील 7,426 गटात राबविली जात असून 50 उद्योगांना आवश्यक असलेले 502 प्रकारचे कौशल्य (trade) चे प्रशिक्षण दिले जात आहे आता पर्यंत 9.9 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळाले असून 5.5 तरुणांना नोकरी मिळाली आहे
या योजनेची तीव्र गरज ग्रामीण भागात आहे कारण ग्रामीण भागातील बेरोजगारीचे मुख्य कारण कौशल्याचा अभाव हे आहे . कौशल्य पूर्ण शिक्षण घेतलेल्या तरुणांना शहरात चांगली नोकरी मिळू शकते . योजने अंतर्गत शिवणकाम, शेतीकाम ,बागकाम ते अतिशय अवघड व मोठ्या उद्योगांना आवश्यक असे तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.