गुरुवार, १३ मे, २०२१

English-Marathi-English ( चला English मध्ये बोलुया ) (Lets speak in English)

 नमस्कार मित्रांनो ,

मी मागील ७ वर्षापासुन English या विषयाचे अध्यापन करत आहे, या दरम्यान मी जे अनुभवले त्या वरून मी  English  शिकवण्याची व शिकण्याची वेगळी  पद्धत  मी वापरणार आहे ,ही वेगळी पद्धत माझ्या अनुभवातुन तयार केली आहे. विद्यार्थ्यांना मध्ये  English ची भीती असण्याचे मुख्य 2 कारणे पुढील प्रमाणे 

  1. विद्यार्थ्यांना English Grammar चे सर्व नियम माहिती असतात मात्र त्यांना Sentence तयार करता येत नाही उदा.  Subject + Verb1 + Object हे सूत्र Simple Present tense चे आहे हे माहिती असते मात्र ते 2-4   sentence पेक्षा जास्त वाक्य तयार करू शकत नाहीत ,आणि हि 2-4 वाक्य पुढील प्रमाणे असतात .  
  •       I am a boy 
  •       She is a teacher.
  •     He is a sport person
  • They are policemen.            
 2.   विद्यार्थी दैनंदिन जीवनात  English भाषेतील अनेक शब्द वापरतात मात्र त्या English शब्दांचा वाक्यात उपयोग करू शकत नाहीत .

उदा. Bike, Electricity, Motor, Car, Driving, Swap, Break, Visit, Show, Programme, Rally, Application, writing, Book, Chatting, Observe, Entry, exit, speaker, gift, Suddenly , accident , hotel, Restaurant , Theater, Ticket, Bridge, share  या सारखे अनेक शब्द आपण दैनंदिन जीवनात वापरत असतोच म्हणजेच दैनंदिन जीवनात वापरत येणारे अनेक शब्द English  असतात आणि आपण ते सहज वापरतो, बरोबर ना? परंतु हेच शब्द English वाक्यात वापरायला सांगितले तर......



वर दिलेल्या GIF सारखी प्रतिक्रिया असते, फसलो मी आता 😱😱😱 कारण आपल्याला English Grammar चे नियम माहिती असतात मात्र ते आपण कधी वापरत नाही, परीक्षा झाली कि विसरून जातो  कि आपण English Grammar शिकलो आहोत. 

मला सांगा कि एका माणसाने नवीन कार विकत घेतली आणि कार कशी चालवायची याचे पुस्तक विकत घेतले आणि सर्व नियम पाठ केले  आणि त्याने कार चालवायला सुरवात केली तर काय होईल ?


 जे वरच्या चित्रात दिसत आहे तेच आपल होत आपण नियम वाचतो मात्र ते वापरत नाहीत जसे कि कार चालवायची सगळी माहिती आहे मात्र कार कधीच चालवली नाही ,तसच grammar माहिती आहे मात्र English बोलतांना भीती वाटते, काहीच आठवत नाही,नियम विसरतो, शब्द सुचत नाहीत मग 30 दिवसात Soken English शिकवणारे class तुम्ही join करता तेथे जाऊन पुन्हा English Grammar शिकता ,तुम्हाला नियम पाठ करायला सांगितले जाते आणि पाचवीला शिकलेले वाक्य पुन्हा शिकवले जातात I am a boy, I eat a apple, She sing a song , etc..........


आपली प्रतिक्रिया हीच असते काहीतरी नवीन सांगा जे मला माहित नाही ,कारण  आपला उद्देश English बोलन असतो ,grammar शिकणे नाही. grammar महत्वाचे नाही असे मी म्हणत नाहीये.

एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले तर तुम्हाला मी काय सांगु इच्छितो ते कळेल.

प्रश्न : तुम्ही मराठी भाषेचे व्याकरण (grammar) अगोदर शिकलात कि मराठी भाषा अगोदर बोललात ?

विचार करा जर आपण आपण मराठी भाषा किंवा आपली मातृभाषा व्याकरण माहिती नसताना बोलू शकतो तर English का नाही?

या वर विचार करा , तुमचे प्रश्न मला  comment box मध्ये टाका ,English बोलणे शिकायचे असेल तर blog follow करा म्हणजे तुम्हाला या विषयावरील post चे notification येईल . माझा विश्वास आहे कि या नवीन पद्धतीने तुम्ही English मध्ये नक्कीच बोलता येईल 

भेटूया पुढच्या blog मध्ये तो पर्यंत स्वत: ची काळजी घ्या ,कोरोना पासून दुर राहा 👍👍👍👍







८ टिप्पण्या:

  1. Sir..Best platform's for learn to English and speak so, I would like it to do this

    उत्तर द्याहटवा
  2. Nice sir
    नक्कीच तुमच्या कडून इंग्लिश शिकायला आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  3. Because of you, I've come to love… (writing, reading, science)I'm so grateful you were my teacher thank you sir

    उत्तर द्याहटवा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

5 minutes for English learning

  Daily Dose of English

सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट