#स्पर्धापरीक्षा #व्यक्तिमत्व विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#स्पर्धापरीक्षा #व्यक्तिमत्व विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ६ मार्च, २०२४

100 Jobs in social work for B.S.W. and M.S.W. Students

 Below is the list of 100 jobs which are available to social work students. The jobs title may be different in other languages but functions will be same . B.S.W. and  M.S.W. students have great scope. Skills required for each jobs may be different but basic knowledge helps you to sustain and grow in any field of social work. if you are student of social work then improve your basic knowledge and skill, select the field in which you would like to work and most important sharpen your skill for that 



सोमवार, १० मे, २०२१

10,000 तास सिद्धांत

10,000 तास यशप्राप्तीचे ....... 

Gladwell's च्या  Outliers: The Story of Success, या पुस्तकात 10,000 तास यशासाठी हि संकल्पना मांडली आहे , या संकल्पनेवर बरीच चर्चा झाली आहे काहीना हि संकल्पना  उथळ  व निरर्थक वाटते तर काहीना हि संकल्पना प्रभावी व जीवन बदलण्यास सक्षम आहे असे वाटते  .

या संकल्पनेचा मुळ पाया हा आहे कि एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी नियमित पूर्ण समर्पण देऊन 10,000 तास सराव किंवा अभ्यास केल्यास व्यक्ती त्य कौशल्यात पारंगत ,निष्णात होतो. वरवर पाहत 10 हजार तास हे खूप सहज सोप वाटत मात्र या साठी सातत्य आणि लक्ष न भटकू देता एकाग्रतेने सराव किंवा अभ्यास करणे अपेक्षित असते ,आणि प्रक्रिया दीर्घकाळ चालते कारण आपण दैनंदिन जीवनातील 24 तासापैकी  सरासरी 8 तास झोप, 6 तास शाळा किंवा  कॉलेज यासाठी  देतो , 2 तास जेवण वैगरे यासाठी  देतो उरतात  8 तास यातही काही आवश्यक कामे असतात, TV पाहणे,खेळणे ,अभ्यास करणे या सारख्या अनेक गोष्टींवर खर्च  करतो त्यामुळे दिवसाला सरासरी 8 ताससुद्धा उरत नाहीत  मात्र  या संकल्पनेत दिवसाला 8  तुम्ही ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे अपेक्षित आहे आणि बंधनकारक आहे ,कारण या पेक्षा कमी वेळ दिल्यास खूप दीर्घ कालावधी लागु शकतो . खालील चित्रात तुम्हाला 10 हजार तासाचे नियोजन मांडले आहे.



   वरील चित्रावर एक दृष्टीक्षेप टाकला तरी आपल्याला या प्रक्रियेचे गांभीर्य कळते ,तुम्ही महेंद्रसिंग धोनी चे एक वाक्य असले असेल त्यात तो म्हणतो कि ध्येय गाठण्यासाठी प्रकियेवर लक्ष दिले गेले पाहिजे 

   कारण आपण  कितीही पर्यंत  वेगाने धावलो किंवा लढलो किंवा अभ्यास केला पण  
आपण जिंकलो नाही किंवा निश्चित केलेले ध्येय पूर्ण झाले  नाही तर आपण केलेले सर्व प्रयत्न  व्यर्थ ठरतात , त्यामुळे ध्येय निश्चित  करताना  विचार पूर्वक करा,उगाचच कोणाच्या तरी प्रभावात येऊन ध्येय निश्चित करणे मूर्ख ठरतो ,ध्येय निश्चित करताना स्व: तची आवड ,अभिवृत्ती , दृष्टीकोन आणि आर्थिक सामाजिक परिस्थितीचा विचार निश्चित करावा. कारण दररोज 8 तास अभ्यास किंवा  सराव केला तरी 5.5 वर्ष लागतात  ,दहा हजार तास पूर्ण करण्यासाठी .

5.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे, तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  सहभाग घ्यायचा आहे तर तुम्हाला खूप मेहनत घेणे आवश्यक आहे , अनेक खेळाडू हे प्रतिभाशाली असतात त्यांच्यात गुणवत्ता असते असे खेळाडू सहज नाव कमावतात मात्र काही खेळाडू असेही आहेत जे कठीण परिश्रम करतात आणि जग विख्यात होतात,प्रतीभ्शाली खेळाडूंना सुद्धा सर्वाची गरज असते.

            MPSC,UPSC आणि इतर सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते ,पोलीस भरतीचेच उदाहरण घ्या, १ जागेसाठी 4 हजार ते ५ हजार उमेदवार असतात. तुम्ही 12 वी उत्तीर्ण झाल्यावर ध्येय निश्चित केले आणि 10 हजार तास हि पद्धत वापरली तरी तुम्ही निश्चितच यश मिळवू शकतात वर्ग १ च्या पदासाठी निवड होऊ शकते जर ध्येय निश्चित करण्यात उशीर झाला तर हा कालावधी अजून वाढू शकतो . 10 हजार तास  अभ्यास तो हि एकाग्रतेने केल्यास यश निश्चित आहे, आणि यश 10 हजार तास पूर्ण होण्यापुर्वीसुद्धा मिळु शकते ,विशेषत स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 हजार तास हि पद्धत उपयुक्त ठरू शकते कारण या व्दारे अतिशय कठीण मानल्या जाणार्या या परीक्षांमध्ये यश प्राप्ती निच्छितच होऊ शकते, काही विद्यार्थी जे अतिशय प्रगल्भ आणि अभ्यासू आहेत यांना या पद्धतीमुळे दैदिप्यमान यश मिळू शकते .

  फक्त नोकरीच नाही तर जीवनातील सर्वच महत्वाच्या घटकांसाठी हि पद्धत उपयुक्त आहे,व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी , शरीर सौष्ठव (body building), वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठी नियोजन करून अभ्यास पूर्ण मार्ग निवडून निश्चित ध्येय प्राप्त करता येऊ शकते.

 10 हजार तास चा मंत्र डोळ्यासमोर ठेवुन तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय कसे प्राप्त करायचे याचे नियोजन करा ,स्व:ताची क्षमता ओळख आणि असलेली क्षमता वाढवण्याच्या पर्यंत करा , यश तुमचेच आहे . सर्व धडपडणाऱ्या तरुणांना शुभेच्छा ,

लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा, comment करा ,लेख आवडला तर तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना पाठवा  , तुम्हाला हव्या असलेल्या विषयाचे नाव टाका त्या विषयवार लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन  




5 minutes for English learning

  Daily Dose of English

सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट