हुकुमशहा हा शब्द उच्चारल्यावर डोळ्यासमोर हिटलर ,मुसोलिनी, स्टँलिन यांचे चित्र समोर येते, सध्या किंम जोंग उन हा हुकुमशहा त्याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत असतो. आजही जगात जवळपास 50 राष्ट्रांमध्ये हुकुमशाही आहे.हुकुमशाही चा अर्थ एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता असणे ,एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता केंद्रित झाल्याने लोकशाही मूल्यांना थारा नसतो. जे काही निर्णय घ्यायचे ते हुकुमशहा त्याच्या मर्जीने घेतो ,त्याचे चांगले वाईट परिणाम जनतेला भोगावे लागतात.जगातील सर्वच हुकुमशहा हे माथेफिरू आणि क्रूर होते उदा. हिटलर . हिटलर ने त्याच्या जादुई वक्तृत्व शैलीने सर्व जर्मन जनतेला प्रभावित केले आणि निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला,नंतर त्याने लोकशाही बरखास्त केली आणि स्वत: च्या हातात सर्व सूत्र घेऊन हुकुमशहा झाला,त्याने जगाला दुसऱ्या महायुद्धात लोटले,ज्यु लोकांवर अमानुष अत्याचार केले.त्याच्या निर्णयामुळे फक्त जर्मन जनताच नाही तर संपूर्ण जग युद्धाने होरपळून गेले ,हिटलर च्या समकालीन असलेले एक व्यक्तिमत्व जो स्वत: हुकुमशहा होता मात्र त्याला जग आदराने वंदन करते, हुकुमशाह असूनही त्याने जनतेवर प्रेम केले ,राष्ट्र विकासासाठी अहोरात्र मेहनत केली. देशाचे आधुनिकीकरण केले असे व्यक्तिमत्व म्हणजे केमाल पाशा उर्फ केमाल अतातुर्क
बालपण :
केमाल पाशाचे खरे नाव मुस्तफा होते, मुस्तफाचा जन्म इ.स. १८८१ मध्ये मेसेडोनियात झाला , त्याच्या वडिलांचे नाव अली रेझा व आईचे नाव झुबैदा होते.त्या काळात तुर्कस्तानात आडनाव हि पद्धतच अस्तित्वात नव्हती . बालपणापासुनच मुस्तफा आक्रमक स्वभावाचा होता हे त्याच्या शाळेतील वागणुकीवरून कळते,त्याला त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्रास दिला तर तो त्यांच्या अंगावर धावुन जात असे. शरीराने अशक्त वाटणारा हा मुलगा मानसिक रित्या खूपच सशक्त होता तसेच वरून शांत दिसत असला तरी आक्रमक होता .
शिक्षण :
केमाल ने धार्मिक शिक्षण घ्यावे असे त्याच्या आईला वाटत होते मात्र केमालचे धार्मिक शिक्षणात मान लागले नाही,केमालच्या आईने अनेक प्रयत्न केले मात्र केमाल नेहमीच इतर मुलांशी व शिक्षकांशी वाद घालत असे, त्याच्या उद्धट वर्तनामुळे एका शिक्षकाने त्याला जबर शिक्षा केली ,केमालने हि शाळा सुद्धा सोडली.केमालने लष्करी शिक्षण घावे असे मत केमालच्या काकांचे होते,सोलानिका या ठिकाणी लष्करी शाळा होती,मात्र झुबैदा ला हे मान्य नव्हते ,केमालने मात्र या वेळी स्व:तहुन पुढाकार घेतला आणि लष्करी शाळेत प्रवेश कसा मिळतो याची सर्व माहिती मिळवली,प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य होती ,केमालने या परीक्षेत यश मिळवले व त्याचा प्रवेश लष्करी विद्यालयात झाला.
या विद्यालयात सुद्धा तो एक उद्धट व मग्रूर विद्यार्थी विद्यार्थी म्हणुन ओळखला जात होता,मात्र त्याला गणित या विषयात चांगली गती होती, त्यामुळे गणित शिक्षक त्याच्यावर खुश होते,या शिक्षकाने त्याचे नाव बदलुन केमाल ठेवले कारण त्याचे (शिक्षकाचे ) नाव हि मुस्तफा च होते. केमालचा अर्थ परिपूर्ण असा होतो.भविष्यात त्याने हे नाव सार्थ ठरवले .
कारकिर्द:
केमालचे सैनिकी शिक्षण पूर्ण झाल्याने त्याला ' Captain' चा अधिकृत मिळाला.सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झाल्यावर जबाबदारीच्या पदावर नेमणूक होणे अपेक्षित होते मात्र महाविद्यालयात असताना केलेल्या चळवळीमुळे तुरुंगवास भोगावा लागला विशेषत: 'वतन ' या संघटनेत राहून केलेल्या कामगिरीमुळे तुरुंगवास भोगावा लागला,या काळात सर्वच महाविद्यालयात तुर्कस्तानच्या सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यापासून ते क्रांती घडवुन आणण्याच्या कात करणाऱ्या अनेक संघटना स्थापन झाल्या होत्या . वतन हि संघटना त्यापैकीच एक होती. केमाल वतन च्या सभांना हजार असायचा ,त्याच्या भाषणांनी आणि लेखनाने प्रभावित केले होते. अशा संघटनांची माहिती सुलताना पर्यन्त गुप्तहेर खात्यामार्फत पोहचत असे, वतन या संघटनेची माहिती मिळाल्यावर केमाल व अजून तीन यूवक जे सुद्धा Captain च्या हुद्दयावर होते त्यांना हि अटक करण्यात आली. केमालचे तुरुंगात खूप हाल झाले ,अर्धवट शिजलेले आन,भरपूर मारहाण आणि वाईट वागणूक मिळाली.मात्र महाविद्यालयाच्या संचालकाने रदबदली केली,न्यायालयासमोर त्यांनी असा मुद्दा मांडला कि 'अश्या सैनिकी शिक्षण घेतलेल्या तरुणांना तुरुंगात डांबून ठेवण्यापेक्षा त्यांना काहीतरी जबाबदारी देवुन त्यांच्याकडून काम करून घेतले जावे.आणि केमालची नियुक्ती राजधानीपासून दूर असलेल्या सिरीयात दमास्कस येथे वाळवंटी प्रदेशात नियुक्ती केली गेली.
१ नोव्हेंबर,१९२२ रोजी केमालने तुर्कस्तानातील सुलतानशाही संपून तेथे प्रजासत्ताक स्थापन झाल्याचा जाहीरनामा काढला ,परंतु या साठी केमालने खूप कष्ट उपसले होते,अतिशय गंभीर संकटाना तोंड दिले होते, १९०६ ते १९२२ या दीर्घ कालावधीत केमालने आपले कर्तुत्व सिद्ध केले होते,अनेक बंड मोडून काढले होते ते त्याने सुलतान च्या आज्ञेनुसार केले असले तरी सोबतच तो स्व:तची संघटना स्थापन करून देशात लोकशाही आणण्याचे पर्यंत निरंतर करत होता, परंतु त्याला खरी लोकप्रियता व लोकमान्यता मिळाली ती पहिल्या महायुद्धातील कामगिरी मुळे, पहिले महायुध्द संपल्यावरसुद्धा ग्रीक ने तुर्कस्तानवर आक्रमण सुरूच ठेवले होते,या काळात सुलतानशाही अतिशय जर्जर अवस्थेला पोहचली होती,लोकांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणारा केमाल हा नायक वाटत होता, केमालाल याच काळात पाशा हि पदवी मिळाली याच काळात केमालच्या सहकाऱ्यांनी तुर्कस्थानात लोकशाही स्थापनेचे अयशस्वी प्रयन्त केले,त्यामुळे तुर्कस्तानची परिस्थिती अतिशय विदारक झाली होती,सामान्य जनता युद्ध व आर्थिक ताणाने भरडली जात होती.युद्ध आणि राजकारण या दोन्ही बाजू सांभाळून केमाल तुर्कस्थानचा अध्यक्ष झाला होता.त्याने हळू हळू सर्व अधिकार आपल्या हाती केंद्रित केले त्यामुळे त्याची ओळख हुकुम्सह अशी झाली मात्र केमाल ला आधुनिक तुर्कस्तान घडवायचा होता त्यासाठी त्याने सर्व आव्हाने पेलली.
सामाजिक -धार्मिक-शैक्षणिक सुधारणा
केमाल लोकप्रिय असला तरी त्याने धर्माच्या चालीरीती बदलण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा जो प्रयन्त केला तो अतीशय धाडसी होता. आपल्या देशाचे धर्म आणि रूढी हेच खरे शत्रू आहेत,इस्लाम आणि त्याच्या नावाने जपलेल्या कित्येक परंपरा ह्यामुळे तुर्कस्तान अशिक्षित व आर्थिक मागासलेला आहे असे केमाल चे पक्के मत होते .देशाची प्रगती कार्याची असेल तर सुरवात धर्म सुधारणे पासून करावी लागेल हे त्याने पक्के केले.त्यासाठी त्याने लोकांचा रोष पत्करला .
- सर्व प्रथम त्याने ३ मार्च १९२४ रोजी खिलापत बरखास्त केली. तुर्कस्तानचा खलिफा हा जगातील सर्व मुस्लीमांचा धर्मगुरू होता. खलिफा हा धर्मप्रमुख व शासन प्रमुख असे , पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानाचे तुकडे करण्याचा इंग्लंड ,फ्रांस व इटली चा डाव होता त्या विरुद्ध भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली होती,म्हणजे ज्या खलिफा पदाच्या संरक्षणासाठी भारतात चळवळ सुरु झाली होती त्याच खलिफा पदाचा शेवट केमाल ने केली ,हा धर्मनिष्ठ लोकांसाठी खूप मोठा धक्का होता.त्याने शिक्षण साठी धर्मग्रंथ पाया असणे केमालला मान्य नव्हते.तुर्कस्तान मध्ये धार्मिक स्वरूपाच्या तंट्या सोबतच विवाह,घटस्फोट इत्यादी वैयक्तिक वाद सुद्धा धार्मिक न्यायालयात न्यावे लागत होते ,केमालाने कायदे करून हे सर्व पद्धत बंद केली.
- दरवेशी हे एक प्रकारचे पंथ होते,मात्र या पंथात हि उपपंथ होते कारण प्रत्येक दरवेशी संघाचे प्रार्थना करण्याचे मार्ग वेगवेगळे होते, मंत्र-तंत्र नृत्यप्रकार जादुटोने इत्यादी मार्ग वापरून आजार बरे करणे ,धन मिळवुन देण्याच्या भूलथापा देत.अडाणी जनता अश्या भूलथाप्पांना बळी पडत होते.इस्लामच्या नावाने राजकारण करत ,सर्वच दरवेशी संघ आपण कुराणनिष्ठ आहोत अस सांगत याच दरम्यान कुर्द समुदायाने उठाव केला या उठावांवर दरवेशी संघाचा प्रभाव होता ,कुर्दांच्या बंडाच्या निमित्ताने केमाल ने या संघांवर बंदी घातली त्यांची मालमत्ता सरकारजमा केली . केमाल हा द्रष्टा नेता होता त्याने चेटूक ,मंत्रसिद्धी ,गंडे दोरे भविष्यकथन हे प्रकार बेकायदा ठरवले , ते साल होते १९२५ आणि भारतात अजूनही हे प्रकार सुरु आहेत .महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंध कायदा लागू करण्यासाठी २०१३ साल उजाडले .या वरून आपल्या लक्षात येते कि कमाल किती द्रष्टा व पुरोगामी विचारांचा नेता होता,त्याने त्या काळात जे केले ते खूप धाडस होते तेच ते सुद्धा तुर्कस्तान या देशात जेथे इस्लाम चे कट्टर अनुयायी होते.
- फेझ टोपी बर बंदी . फेझ हि तुर्कांची पारंपारिक ओळख होती . केमालला मात्र फेझ टोपी मागसल्या पानाचे लक्षण वाते,तुर्की लोकांना फेझ आपल्या संस्कृतीचे आणि श्रेष्ठतेचे प्रतिक वाटत होते मात्र केमाल ला फेझ टोपी धर्मवेड्या संस्कृतीचे प्रतिक वाटायचे .
फेझ टोपी |
केमालने स्व:त रोमन लिपी ग्रामीण भागात जाऊन शिकवली |
रोमन लिपी प्रसार करण्याचे काम त्याने स्व:त अनेक गावात जाऊन केले. तेथील हुशार तरुणांना शिकवले व त्यांना इतर लोकांना शिकवण्यासाठी प्रोस्ताहित केले. त्यने या लिपीला रोमन लिपी न संबोधता 'तुर्की' लिपी संबोधले कारण तुर्की लिपी हे संबोधन देशाभिमान प्रकट करत होते.